Turtle Festival

Turtle Festival




          सगळ्यांच्या नजरा टोपलीवर खिळलेल्या, photographers श्वास रोखून फोरेस्ट ऑफिसरच्या हातातील टोपलीकडे पाहत होते आणि त्यांनी टोपलीतून एक छोटेसे गोंडस समुद्री कासवाचे पिल्लू बाहेर काढून समुद्राच्या त्या गार वाळूवर ठेवताच त्या पिल्लाची हालचाल समुद्राच्या दिशेने चालू झाली! एक, दोन, तीन............असे सोळा छोटेसे समुद्री कासव सागराच्या दिशेने शर्यतीत तुरुतुरु धाऊ लागली.... एक क्षण कळेचना फोटो काढू की नको, त्या छोट्याश्या गोंडस श्या समुद्री कासवांनी संमोहित करून टाकले.............. मनात एक प्रश्न दत्त म्हणून उभा!!! बिचाऱ्या ह्या तान्हुल्यांना एवढी तंगड तोड कशाला? सोडायचे की समुद्रात!!! पण तेवढ्यात वेलासाच्या कासव मित्र सौथेच्या कार्यकर्त्यांनी खुलासा केला की, "ही चिमुकले ज्या सागरी किनाऱ्याहून तुरुतुरु करत पहिल्यांदा सागरात जातात त्याच किनाऱ्यावर ते अंडी घालण्यास येतात" वेलास नाव तसे इंग्लिशच पण अस्सल कोकणी, शेणाने सारवलेली घरे नारळ-पोफळीच्या बागा, निसर्ग सौंदर्याची उधळण, तशीच तिकडची लोकही मायाळू, मनमोकळी, एकमेकांस मदत करणारी, मिसळून राहणारी. तसेच निरनिराळे पक्षी, झाडे, लोभस आणि अप्रतिम सामिद्री किनारा.........खूप छान, खूप सुंदर. लवकरच नक्की जाऊन या परत परत जाण्याचे मग तुम्हीच प्लान आखल हे १००%....






Comments

Muito interessante o festival das tartarugas
Muito interessante o festival das tartarugas

Popular posts from this blog

Mission Tiger....