Mission Tiger....

                                                

Mission Tiger.... Pench & Kanha National park. Part I

आम्ही १० जण मुंबईहून तर परेश हैदराबाद हून नागपूरला पोहचलो. Travlar नागपूर स्टेशन ला आमची वाट पाहत होती. परेश सोबत गळाभेट घेऊन सगळे ट्रॅव्हलर मध्ये बसून कांचनच्या घरी गेलो, कांचनने बनवलेल्या पोहे-चणे अन फ्रुट सलाड फस्त करून नागपूर सोडले. मध्ये रामटेक मंदिर पाहून दर्शन घेऊन पुढे जमलेच तर पेंच National पार्क पाहून रात्री परेन्त कान्हा National पार्कला पोहचू असा बेत ठरला. परंतु दुसऱ्या दिवशी रामनवमी असल्याने रामटेकला गर्द्दी असेल, अन दुसरे कारण की रामटेक उंचावर आहे तर एवढ्या गर्मीत चढण्यात वेळ घालवण्यापेक्षा पुढे ४ km. एका तलावा जवळ वेळ घालवून मग पेंच ला दुपारी ३ च्या सफारीला पोहचू असे ठरवून रामटेकच्या रामाला गाडीतूनच नमस्कार करून तलाव शेजारी थोडा वेळ घालवून आम्ही पेंच न्याशांल पार्कच्या मार्गाला लागलो. ट्रॅव्हलर मध्ये कायम तोंड चालू ठेवण्यासाठी प्रणिता आणि वंदूताईने वेगवेगळे चकण्याचे प्रकार आणले होते. तरी दुपारचे जेवण उरकवून दुपारी ३:२० ला पेंच ला पोहचलो.
मेन गेट पाशी आमची माहिती देऊन फोरेस्ट ऑफिस मध्ये सफारीचा ट्रक नसल्याने माणशी ७५/- तर ट्रॅव्हलर गाडीचे चे ८००/- आणि गाईड चे ३००/- असे पैसे भरून आमची मिशन टायगर सफारी सुरु झाली.

Greater racket-tailed drongo, Greater coucal, Indian roler, Lesser golden-backed woodpecker, काळ्या तोंडाची वानर, लाल धूंगणाचे वानर असे एक-एक रंगीत-रंगीत पक्षी प्राणी दिसू लागले आणि आता समोर आला तो मोठा प्राणी भारतीय गवा, ह्याचे विशेष म्हणजे ह्याचे पाय गुढग्या खाली पांढरे असतात. खूपच मोठा त्यांचा ग्रुप होता ग्रुप मध्ये लहान गवा सुद्धा होते आणि त्यांचा म्होरक्या तर तगडा सांड, खतरनाक एकदम. गाईड आपले काम खुबीने करत होता, एखाद्या पक्षाचा आवाज ऐकून त्याचे नाव सांगणे आणि त्याची माहिती देत होता. आमच्यातील काही जण पहील्यांदाच जंगलाचा अनुभव घेत होते. तरी पण सगळ्यांना उत्सुकःता होती ती वाघाची.
गवा पाहून पुढे अजून एक चौकी पार करुन आम्ही अजून पुढच्या जंगलात घुसलो. अर्थातच आम्ही गाडीत होतो  .
गाईडने मग आम्हाला पेंच मधील एका धबधब्याकडे नेले, २ वर्षा पूर्वी येउन गेलेल्या आठवणींना उजाळा दिला तो स्वप्नीलने. गाडी बन्द करून गाडीतून जसे उतरलो तसे जंगल जास्तच बोलायला लागले. संध्याकाळची वेळ होती वेगवेगळ्या पक्षांचे ओळखीचे - अनोळखी आवाज कानावर येत होते तसा आमचा गाईड त्याचे विश्लेषण करीत होता. मोर-लांडोर मियाआव्व......... वा!........ जशी कानाला नवी मेजवानीच मिळाली होती. धबधब्याकडे फोटो काढत असताना यश ने आवाज दिला आणि एकटा चारणाऱ्या गाव्याकडे पाहायला सांगितले. त्याला पाहताच आयचा घो! हाच पहिला शब्द तोंडातून बाहेर पडला. तगडा, रांगडा असे जे काही बोलतात ते हेच हे प्रत्यक्षात पहिले. शोच्यालयाचा आडोसा घेत अजून जवळ गेलो फोटो काढायला अन अचानक एकमेकांसमोर आलो अन!………अन.............. अन......... दोघांनी एकमेकांना पहिले तो एक क्षण ठोके बंद पडलेत कि काय असा विचार येतो न येतो तोच दोघेही मागे फिरलो तो बिचारा वर झाडीत तर मी मुतारीत घुसलो. तो लांब गेलेला पाहून मग कोणालाही काही न बोलता मचाणावर,ब्रिजवर ग्रुप फोटो काढून परत आपल्या गाडीपाशी यायला निघालो. गाडी परतताना Malabar pied हॉर्नबिल ची जोडी तर काळा-पंधरा Asian paradise flycatcher male दुर्लभ दर्शन झाले. गवा मग चितळ दिसालीत, सांबर दिसालीत तरी पण नजर शोधीत होती ते वाघालाच!

संध्याकाळचे ६ वाजले तसे आम्ही पेंच मधून बाहेर पडलो आणि वाटेत चहा पाणी घेऊन कान्हाच्या मार्गाला लागलो. रात्रीची गाडीतील सफर अविस्मरणीय होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला पळसाच्या फुलांनी बहरलेली झाडे पाहण्यासाठी रात्री १२ वाजताही डोळे विस्फारलेले होते.

Comments

Popular posts from this blog

Turtle Festival