थरार ढाकबहिरीचा
वाकडहून रात्री ९ वाजता दोन दुचाकी ४ जाणांचे ओझे पेलवत तलेगावाच्या दिशेने निघाले. त्यांना अजून एक दुचाकीसह अजून दोन साथीदार मिसळले ते तळेगावला, एकूण ६ सवंगडी निघाले कामाशेतच्या दिशेने, वाटेत रेल्वेचे फाटक ओलांडून स्वारी लागली आता कोंडेश्वरच्या मार्गाला. एव्हाना रात्रीचे 1२ वाजून कधी गेले कळलेच नाही. पोर्णिमा २-४ दिवसापूर्वी गेल्याने चंद्र प्रकाशाचा झोतही जसा आमच्यावरच होता, हवेतील गाराव्याने अंगाशी झोंबी घ्यायला सुरवात केलेली. आम्हीही तिच्याशी मग तिला विरोध नकरता बोचऱ्या नव्या थंडीचे स्वागतच केल. रस्ता मागे टाकल्यावर बुडाला आराम आणि निसर्गधर्म करण्यास थांबली स्वारी ती एका पुलावर. साही सवंगडी धाकाधुकीच्या जीवनाला विसरून त्या आल्हाददाई वातावरणात संमोहित होऊन गेले होते. :-) :-) :-) एका गड्याने लगेच धुम्र नलिका शिलगावली तसा दुसरा गाडीही त्याला जाऊन मिळाला आणि गप्पांमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर होते पण भानावर येउन जांभिवली गाव मागे टाकून माती,दगड असलेल्या रस्त्यावरून चढायला लागले, मधेच मागील गडी उतरवून दुचाकी पुढे निघून अंधारात गायब.…… बाकी तिघे चंद्रप्रकाशात मार्ग चाचप