थरार ढाकबहिरीचा


     वाकडहून रात्री ९ वाजता दोन दुचाकी ४ जाणांचे ओझे पेलवत तलेगावाच्या दिशेने निघाले. त्यांना अजून एक दुचाकीसह अजून दोन साथीदार मिसळले ते तळेगावला, एकूण ६ सवंगडी निघाले कामाशेतच्या दिशेने, वाटेत रेल्वेचे फाटक ओलांडून स्वारी लागली आता कोंडेश्वरच्या मार्गाला. एव्हाना रात्रीचे 1२ वाजून कधी गेले कळलेच नाही. पोर्णिमा २-४ दिवसापूर्वी गेल्याने चंद्र प्रकाशाचा झोतही जसा आमच्यावरच होता, हवेतील गाराव्याने अंगाशी झोंबी घ्यायला सुरवात केलेली. आम्हीही तिच्याशी मग तिला विरोध नकरता बोचऱ्या नव्या थंडीचे स्वागतच केल. रस्ता मागे टाकल्यावर बुडाला आराम आणि निसर्गधर्म करण्यास थांबली स्वारी ती एका पुलावर. साही सवंगडी धाकाधुकीच्या जीवनाला विसरून त्या आल्हाददाई वातावरणात संमोहित होऊन गेले होते. 

एका गड्याने लगेच धुम्र नलिका शिलगावली तसा दुसरा गाडीही त्याला जाऊन मिळाला आणि गप्पांमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर होते पण भानावर येउन जांभिवली गाव मागे टाकून माती,दगड असलेल्या रस्त्यावरून चढायला लागले, मधेच मागील गडी उतरवून दुचाकी पुढे निघून अंधारात गायब.…… 
बाकी तिघे चंद्रप्रकाशात मार्ग चाचपडत चढणीवर चालायला लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष, झाडी न्याहाळत, सावधपणे चालू लागले. गप्पा मारत समोर झाडीत काहीतरी पांढरे पांढरे काही तरी दृष्टीस पडले तसे माझ्या मनात चर्रर झाले पण सांगतोय कोणाला! शिवाजीचे सह्याद्रीचे मावळे आम्ही, भीती ऐवजी कुतूहलच जास्ती…… थोडे त्या पांढऱ्या रंगाच्या मागावर लागताच कोडे उलगडले आणि माझे मलाच हसू आले ……. हे हे हे 
. चंद्र प्रकाशात कोंडेश्वर महादेवाचे मंदीर काहीतरीच खुलून दिसत होते. तीनही बाजूने डोंगर मध्ये कोंडेश्वर महादेवाचे मंदीर, चंद्र असुनाची तारेही सोबतीला तेवढेच आपली जाणीव करून देत होते. मधोमध जसा शंभो महादेव स्वयं प्रकाशित आणि नंदी महाशय आमची वाट पाहत मंदिरा बाहेर पहारा देत उभे!……। कोणाची मिजास नंदी महोदयांना अभिवादन नकरता पुढे जाऊन महादेवाचे दर्शन घेण्याची!!!…… नंदीला प्रथम नमन करून मंदिराचे लोखंडी दरवाजा उघडला तसा बिजागरे कुरकुरली. गाभाऱ्यात महादेव शिवलिंगाच्या रुपात ध्यनस्त. 
मधल्या मंडपात वारुळाचे रुपांतर शिवलिंगात झाल्यासारखे आणि साधारणता एक फुटा परेन्त वाढलेले. सर्वांनाच आश्चर्य अन कुतूहलही. आम्ही प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूला आमची समान ठेऊन महादेवाचे दर्शन प्रथम घेतले. परत मंदिराबाहेर आलो. 
ताऱ्यांचे निरीक्षण, राशी कोणती, ध्रुव तर कोठे, उत्तर दिशा कोठे ह्याची माहिती प्रतिकने फारच छान दिली. रात्रीच ढाकला जाण्याचा हि एक ठराव झाला, पण पाहाटे निघण्याचा ठराव उचलून धरला. मंदीराचा परिसर त्या चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाला होता, अन अशा क्षणी मंदिरात जाऊन झोपायला कोणाचे मन तयार होणार हो!!!………. होऊ दे खर्च……। हे हे हे 
एव्हाना रात्रीचे २ वाजून गेलेले पण कोणीच झोपायला तयार होइनत. सगळेच एकत्र गाभाऱ्यात जमले आणि एकत्र ओंकार…… आणि तोही रात्री २ वाजता!!! संपूर्ण गाभारा कंपित, पूर्ण शरीरात कंप, काय तो कंप काय तो अनुभव………आहा हा हा हा…… हरी ओम तद सद!!! परत सारे मंडपात झोपायला आले आणि ट्रेकिंगचा नेहमीचा अनूभव, घोरन्याची शर्यत आणि नंतर त्यावरील हास्य………… हा हा हा. 
सकाळी ६ चा गजर वाजताच मी सर्वांना उठवले, खोलिवर सदा पसरणारी मंडळी १-२ हाकेतच पसारा आवरत सगळे ढांक बहिरी साठी निघाले, निघताना अर्थातच महादेवाचे आशिर्वाद घेउनच. 
प्रात:विधीसाठी अर्धे गडी झाडीत गायब झाले. आपापली कामे आटपून स्वारी निघाली गडाच्या दिशेने……. हर हर महादेव 

Comments

Popular posts from this blog

Turtle Festival

Mission Tiger....