Posts

थरार ढाकबहिरीचा

     वाकडहून रात्री ९ वाजता दोन दुचाकी ४ जाणांचे ओझे पेलवत तलेगावाच्या दिशेने निघाले. त्यांना अजून एक दुचाकीसह अजून दोन साथीदार मिसळले ते तळेगावला, एकूण ६ सवंगडी निघाले कामाशेतच्या दिशेने, वाटेत रेल्वेचे फाटक ओलांडून स्वारी लागली आता कोंडेश्वरच्या मार्गाला. एव्हाना रात्रीचे 1२ वाजून कधी गेले कळलेच नाही. पोर्णिमा २-४ दिवसापूर्वी गेल्याने चंद्र प्रकाशाचा झोतही जसा आमच्यावरच होता, हवेतील गाराव्याने अंगाशी झोंबी घ्यायला सुरवात केलेली. आम्हीही तिच्याशी मग तिला विरोध नकरता बोचऱ्या नव्या थंडीचे स्वागतच केल. रस्ता मागे टाकल्यावर बुडाला आराम आणि निसर्गधर्म करण्यास थांबली स्वारी ती एका पुलावर. साही सवंगडी धाकाधुकीच्या जीवनाला विसरून त्या आल्हाददाई वातावरणात संमोहित होऊन गेले होते.  :-) :-) :-) एका गड्याने लगेच धुम्र नलिका शिलगावली तसा दुसरा गाडीही त्याला जाऊन मिळाला आणि गप्पांमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर होते पण भानावर येउन जांभिवली गाव मागे टाकून माती,दगड असलेल्या रस्त्यावरून चढायला लागले, मधेच मागील गडी उतरवून दुचाकी पुढे निघून अंधारात गायब.……   बाकी तिघे चंद्रप्रकाशात मार्ग चाचप

Mission Tiger....

Image
                                                 Mission Tiger.... Pench & Kanha National park. Part I आम्ही १० जण मुंबईहून तर परेश हैदराबाद हून नागपूरला पोहचलो. Travlar नागपूर स्टेशन ला आमची वाट पाहत होती. परेश सोबत गळाभे ट घेऊन सगळे ट्रॅव्हलर मध्ये बसून कांचनच्या घरी गेलो, कांचनने बनवलेल्या पोहे-चणे अन फ्रुट सलाड फस्त करून नागपूर सोडले. मध्ये रामटेक मंदिर पाहून दर्शन घेऊन पुढे जमलेच तर पेंच National पार्क पाहून रात्री परेन्त कान्हा National पार्कला पोहचू असा बेत ठरला. परंतु दुसऱ्या दिवशी रामनवमी असल्याने रामटेकला गर्द्दी असेल, अन दुसरे कारण की रामटेक उंचावर आहे तर एवढ्या गर्मीत चढण्यात वेळ घालवण्यापेक्षा पुढे ४ km. एका तलावा जवळ वेळ घालवून मग पेंच ला दुपारी ३ च्या सफारीला पोहचू असे ठरवून रामटेकच्या रामाला गाडीतूनच नमस्कार करून तलाव शेजारी थोडा वेळ घालवून आम्ही पेंच न्याशांल पार्कच्या मार्गाला लागलो. ट्रॅव्हलर मध्ये कायम तोंड चालू ठेवण्यासाठी प्रणिता आणि वंदूताईने वेगवेगळे चकण्याचे प्रकार आणले होते. तरी दुपारचे जेवण उरकवून दुपारी ३:२० ला पेंच ला पोहचलो. मेन गेट पाशी आमची माहित

Turtle Festival

Image
Turtle Festival           सगळ्यांच्या नजरा टोपलीवर खिळलेल्या, photographers श्वास रोखून फोरेस्ट ऑफिसरच्या हातातील टोपलीकडे पाहत होते आणि त्यांनी टोपलीतून एक छोटेसे गोंडस समुद्री कासवाचे पिल्लू बाहेर काढून समुद्राच्या त्या गार वाळूवर ठेवताच त्या पिल्लाची हालचाल समुद्राच्या दिशेने चालू झाली! एक, दोन, तीन............असे सोळा छोटेसे समुद्री कासव सागराच्या दिशेने शर्यतीत तुरुतुरु धाऊ लागली.... एक क्षण कळेचना फोटो काढू की नको, त्या छोट्याश्या गोंडस श्या समुद्री कासवांनी संमोहित करून टाकले.............. मनात एक प्रश्न दत्त म्हणून उभा!!! बिचाऱ्या ह्या तान्हुल्यांना एवढी तंगड तोड कशाला? सोडायचे की समुद्रात!!! पण तेवढ्यात वेलासाच्या कासव मित्र सौथेच्या कार्यकर्त्यांनी खुलासा केला की, "ही चिमुकले ज्या सागरी किनाऱ्याहून तुरुतुरु करत पहिल्यांदा सागरात जातात त्याच किनाऱ्यावर ते अंडी घालण्यास येतात" वेलास नाव तसे इंग्लिशच पण अस्सल कोकणी, शेणाने सारवलेली घरे नारळ-पोफळीच्या बागा, निसर्ग सौंदर्याची उधळण, तशीच तिकडची लोकही मायाळू, मनमोकळी, एकमेकांस मदत करणारी, मिसळून राहणारी. तसेच निरन

नर्मदा परिक्रमा

Image
My journey to Narmada  Am completed Narmada Parikrama approx 3000km in 72 days. Start Parikrama from Omkareshwar.